शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

मृत्युपत्र का व कसे

माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यु हि जन्म घेत असतो. आणि त्या हर एखाद्यला मृत्युपत्र किंवा Will याबद्दल विचारले तर त्यात  वाईट किंवा नाराज होण्या सारखी गोष्टच काय? जो जन्माला आला तो कधी न कधी तरी जाणारच. आता जाण्या अगोदर संपूर्ण आयुष्यात त्याने  जे काही कमावलेले असेल,  भले तो माणूस लखपती, करोडपती नसेल त्याच्या वाटणीचे जे काही असते ते आपल्या पाश्चात कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला मिळावे अशीच त्याची इच्छा असते. 
पण जर त्या व्यक्तीने आपले मृत्युपत्र तयार केलेले नसेल त्यातून मृत् पावलेली व्यक्ती कुटुंब प्रमुख असेल तर त्याच्या पाठीमागे जे  वारस पात्र उरतात, त्यांना खरा लाभ मिळेपर्यंत त्यांचे  हाल होतात, खूप मनस्ताप भोगावा लागतो, सर्व ठिकाणी मृत्युचा दाखला देवूनही प्रसंगी निराशा पदरी पडते आणि  लाभ मिळण्यास विनाकारण उशीर होतो. पण जर मृत्युपत्र केले असेल तर मात्र हि प्रक्रिया खूप सोपी कमी कालावधीत होते. आणि आजकालच्या धकाधकीच्या, असुरक्षित जीवनात जिथे कधी काय होईल याचा नेम नाही. अशा वेळी साधारण ५० शीच्या आसपास मृत्युपत्र केले तरी हरकत काहीच नाही.
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली असल्यास चांगले , म्हणजे आपली प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते

समाजात मृत्यूपत्र बाबत जे  गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा एक प्रयत्न :-

१) मृत्यूपत्र करण्या साठी वकिलाची गरज नसते; साध्या फुलस्केप पेपर वर किवा A४ साईझ पेपर वर  सुद्धा ते करता येते. कोर्ट फी,  स्टंप पेपर याचीही काही जरूर नाही.
२) तुम्ही स्वतः आयुषयात कमावलेल्या सर्व चल- अचल (Libalities & Assets) चा त्यात समावेश करावा.
३) जर वारस आज्ञानी, लहान , किवा मतीमंद असेल तर मृत्यूपत्र द्वारे एक विश्वस्त नेमावा जो सर्व प्रकारे अंमलबजावणीस जबाबदार असेल. 
४) तुमचे मृत्युपत्र हे केव्हाही रद्द करता येते व बदलता  येते, किंवा त्यात प्रसंगानुरूप हवे तेव्हा,  हवे तेवढे बदलही करता येतात. पण नवीन मृत्युपत्रात , जुने मृत्युपत्र (तारखेचा उल्लेख करून) रद्द कले असे नमूद करावे अथवा ते फाडून नाहीसे करावे. 
५) मृत्युपत्रावर किमान दोन विश्वस्तांची / साक्षीदारांची सही त्यांच्या नाव पत्ता सहित घ्यावी , पण जे वारस असतील ते विश्वस्त म्हणून सहीला पात्र नाहीत हे  लक्षात घ्यावे. 
६) मृत्युपत्र बनवल्यावर त्याची माहिती सर्व वारसांना  द्यावी व त्यांना माहित आहे अशा ठिकाणी मृत्युपत्र  ठेवावे. 
 आपल्या माहितीकरिता खाली मृत्युपत्र नमुना देत आहे. जर मायाजाल वरून थेट हवे असेल तर मृत्युपत्र क्रमांक-१ साधे मृत्यूपत्र साठी  इथे  टीचकी मारा.


श्री. बेरारकर काका ......

मी जेव्हा पाचवी ते सातवी कळव्याच्या ज्ञानप्रसारणी शाळेत शिकत होतो तेव्हाचा माझा एक मित्र श्याम बेरारकर हा मला आठवतो. त्यावेळी नुसता आमच्या वर्गात नाही तर सर्व शाळेत आपल्या हसतमुख , खोडकर गमत्या स्वभावाने परिचयाचा होता. सतत डावा हात अडवा करून आपली खाली सरणारी शाळेची खाकी विजार (Pant) सावरत असायचा जोडीला  सु, सु, करीत नाकाने आवाज करीत श्वास घ्यायचा.

बुधवार, २ जानेवारी, २०१३

भारत पाक फाळणी एक स्मृती


सन १९४७ ला भारत पाक फाळणी झाली. तेव्हा परिस्थिती खूपच बेकार होती अंदाजे ५ लाख माणसे मारली गेली.  ज्या कटू आठवणी आहेत  त्याची हि छायाचित्र.  मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर  टीचकी मारा.



मंगळवार, १ जानेवारी, २०१३

गाडीतला तो ...

शनिवार असल्याने गाडीला तुरळक गर्दी होती.  पुढील स्टेशनावर मला उतरायचे असल्याने मी दरवाजातच उभा होतो. एवढ्यात माझ्या बाजूला दोन्ही पायाने अपंग असलेला एक तरुण मुलगा आपली चारचाकी ढकलगाडी (Trolly )घेवून दरवाजाजवळ येवून बसून राहिला. त्यालाही पुढील स्टेशनावर उतरायचे होते. आता डब्यातील सर्वांचे लक्ष त्या मुलाकडे लागले होते काहीजण कुतूहल म्हणून तर काहीजण चिंता म्हणून. कारण जे  त्याच्या मागे येवून उभे राहिले होते ते हा कधी उतरणार आणि त्यानंतर मग आपल्यला कधी उतरायला मिळणार याच  चिंतेत होते. त्याला मात्र त्याची फिकीर नव्हती,  तो बिनधास्त होता. आपल्याला मिळालेली चिल्लर रक्कम हातात खुळखुळवत बाहेरील पळणारी दृश बघत होता. आता गाडीचा वेग मंदावला कारण  पहिला डबा  स्टेशनात शिरत होता.