सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

अरे ... हा तर महापूर

गेले दोन दिवस लोकल ट्रेन चे जे काही प्रताप चालले आहेत त्याने सामान्य प्रवाशांचे  खूपच हाल  झाले.  मीही कळवा येथे ट्रेन येत नव्हती म्हणून ठाण्याला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. गाडी जशी स्टेशनच्या परिसरात आली  ती  तिथेच अडकून पडली. खिडकीतून पहिले तर बसच्या मागेपुढे सर्व बाजूला फक्त टूर टूर  करणाऱ्या  ऑटो रिक्षाच दिसत होत्या. आता स्टेशन पर्यंत चालत जाण्याशिव्याय पर्याय नव्हता. खरच काय गमंत आहे पहा भारतात पेट्रोल, डिझेल यांचे भाव नियमित वाढत असताना रोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने कशी काय रस्त्यावर दाखल  होतात?.  हेच जर मी ऑटो रिक्षात बसलो असतो तर दुचाकी वाले इकडून,  तिकडून आपल्या गाडीला वाट देत,  प्रसंगी पादचारी मार्गावर गाडी चढवून पुढे जायला मागतात. जणू पळा,पळा कोण पुढे पळतो  हि स्पर्धा लागली कि काय? असे वाटते.  हा गाड्यांचा महापूर नव्हे काय?
           मग वाटायला लागले कि आपल्या इकडे महापुराची काहीच कमी नाही.

शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

मुंबईची जुनी ओळख

ज्या मुंबईत आपण राहतो त्याची शतक अगोदरची ओळख या छायाचित्रांच्या माध्यमातून . माहिती आभार मायाजालवरून .


कोल्हापूर

डी २२/१२/२०१२ ला कोल्हापूरला जाण्याचा योग आला. आणि महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपिठातल्या एका देवीचे दर्शन झाले. त्यानंतर जोतीबा , नृसिंहवाडी , चिन्मय गणपती, कणेरी मठ या ठिकाणी फिरणे झाले. त्यापैकी काही ठिकाणी सुरक्षिततेच्या  दृष्टीने छायाचित्रणास बंदी घातली आहे म्हणून इथे ते दाखविलेले नाही.



 १) चित्र:- करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी

आपण सारे अर्जुन


मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेन ने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच  बनला आहे. याच लोकल ने मी हि प्रवास करतो, माझी पाठीवरची बॅग ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो तर तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती धर्म , पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात. या मध्ये कोणी काळा तर कोणी गोरा, कोणी ऊंच तर कोणी ठेंगू , कोणी तरुण कॉलेज कुमार तर कोणी निवृत्तीला आलेले सदगृहस्त, कोणी नीटनेटका कडक इस्त्री केलेल्या कपड्यात तर कोणी गबाळा, कोणी घाऱ्या डोळ्यांचा तर कोणी नीळा , तपकिरी. प्रत्येकाची चण वेगळी, शरीराची ठेवण वेगळी. पुन्हा हे सगळे जण कसे आपआपल्या उद्योगात मग्न. कोणाचे पेपर वाचन, तर कोणाचे पुस्तक वाचन, कोणी mobile वरती गाणी ऐकण्यात मग्न तर कोणी डोळे मिटून आपल्याच नादात तल्लीन, या प्रवासात जे रोज भेटतात त्यांचा एक समूह (Group ) तयार झालेला असतो. आणि मग त्यांच्यात एक प्रकारचे वेगळे नाते तयार झालेले असते. या भावनिक बंधातून एकत्र येवून स्वखर्चाने दसरा आणि आषाढी एकादशी सारखे सण साजरा करतात. या दोन दिवशी संपूर्ण गाडीमध्ये पताका,फुले यांनी गाडी सजवून देवांचे फोटो लावून पूजा केली जाते प्रसाद वाटला जातो.  इतर दिवशीही  रोजाचा ढोकळा, इडली, सामोसा असा काहीना काही नाश्ता ते लोक (वर्गणी काढून) करतात.

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

सुमारे शतक पूर्वचा भारत एक स्मृती

ज्या भारतात आपण राहतो त्याचे साधारण शतक पूर्व कसे रूप होते ते पहायचे आहे काय मग खालील   चित्रे  पहा.

 

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

जागरूक बना

मित्रहो
आपण सर्वांनी Gas  Cylinder  च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृशीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे.
आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas  Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा.
१) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire  होणार त्याचे  वर्ष छापलेले असते. आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी. म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५  यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात. म्हणून A म्हणजे जाने. फेब्रु. मार्चं आणि B म्हणजे एप्रिल मे जून होय तर "C"  म्हणजे जुल,ऑगस्ट,सप्टेम्बर, आणि D म्हणजे ऑक्टोबर,नोव्हेब,डिसेबर  होय.   
आता A /१२ म्हणजे तो Cylender साल २०१२ च्या जाने. फेब्रु. मार्चं पर्यंतच कार्यक्षम आहे. त्या नन्तर तो पुन्हा वापारात यायला नकोय असा होतो. आणि जर तुम्हाला असा Expiry  date  नन्तर ही भरलेला गॅस आढळला तर तो सुरक्षितत रित्या वापरण्यास अयोग्य आहे असा होतो. तेव्हा पुढच्या वेळी गस गेस वाला दारात आला असता प्रथम ती पट्टी तपसून पहावी.म्हणजे पुढील होणारा अपघात टाळ्ता येईल.