शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

श्री. बेरारकर काका ......

मी जेव्हा पाचवी ते सातवी कळव्याच्या ज्ञानप्रसारणी शाळेत शिकत होतो तेव्हाचा माझा एक मित्र श्याम बेरारकर हा मला आठवतो. त्यावेळी नुसता आमच्या वर्गात नाही तर सर्व शाळेत आपल्या हसतमुख , खोडकर गमत्या स्वभावाने परिचयाचा होता. सतत डावा हात अडवा करून आपली खाली सरणारी शाळेची खाकी विजार (Pant) सावरत असायचा जोडीला  सु, सु, करीत नाकाने आवाज करीत श्वास घ्यायचा.

माझ्या या मित्राचे वडील मात्र कडक शिस्तेचे, करारी मुद्रेचे होते. पण स्वभाव गरीब. आवाज खर्डा.  त्यांना समाजसेवेची कळकळ. त्या साठी ते Lions club चे सहकार्य करायचे. जिथे जिथे रक्तदान शिबीर असायचे तेथे ते हजार असायचे रिक्षात फिरून लोकांना ताचे महत्व पटवून द्याचे कारण १९८३-८४ पर्यंत जिथे T.V. नव्हता तिथे इंटरनेट, मोबाइलची तर गोष्टच सोडा. 
            असे हे काका नुसते आवाहन करून थांबायचे नाहीत तर प्रत्येक ठिकाणातील शिबीरात स्वतः रक्तदान करायचे आणि मगच ते  लोकांना आवाहन करायला बाहेर पडायचे. असे करता करता त्यांनी एकून १०२ वेळा रक्तदान केले आहे. 
लोकोपयोगी पडावे म्हणून त्यांनी केलेले काम खरोखरच स्तुत्य आहे. मी समाजसेवा करतो असे नुसतेच म्हणणारे आजचे नगर सेवक यांनी या पासून धडा घ्यावा.  
        शाळा सुटली मित्र पांगले. आता श्याम कुठे असतो? काय करतो? त्याचे कुटुंबीय कसे आहेत ह्याचा काहीच पत्ता नाही.
        खर्या तळमळीने समाजासाठी काम करणरे बेरारकर काका यांना माझा सलाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा