गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

दृष्टी भ्रम अर्थात ILLUSION

एकदा अकबर बादशाहने बिरबलला एक प्रश्न विचारला कि "खरे आणि खोटे यात अंतर किती?"  बिरबलाने लगेच उत्तर दिले कि "चार बोटे". बादशहा चाट पडला म्हणाला कि कसे काय? तेव्हा  बिरबलाने त्वरित समजावले कि कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर असते म्हणजे  जे आपल्या कानाने ऐकू येते त्यावर भले आपण विशास ठेवू न ठेवू  पण जे आपण डोळ्याने पहातो त्या नक्कीच खऱ्या आहेत असे समजावे. बिरबलाने सांगितले ते खरेच होते.
 पण या जगात दृष्टीभ्रम, भास हे प्रकार हि आहेत बरका!  खालील काही चित्रे पाहिल्यास आपणास समजेल कि हे  जग किती अद्भुत अद्भुत  गोष्टींनी भरलेले आहे. यालाच Illusion (दृष्टीभ्रम, भास) म्हणतात.   

१.खालील चित्रात जे अधिक चे चिन्ह आहे त्याकडे एकाग्रतेने पाहत रहा. थोड्याच वेलाट तुम्हास असे दिसून येईल कि  जे गुलाबी रंगाचे बिंदू आहेत ते जाहीसे होत जावून एकच हिरव्या रंगाचा गोल त्या अधिक चिन्ह भोवती फिरत राहतो.

 २. आता खालील चित्रात किती खांब आहेत ते पहा. तळाशी ते ३ दिसतात तर वर पाहिल्यावर ते २ आहेत आणि ती चोकोनी कमान आहे असे वाटते.

 ३.  आता खाली चित्रातील मध्यभागी जो  काळा बिंदू आहे तेथे नजर स्थिर ठेवून आपल्या मानेची मागे पुढे अशी हालचाल करा म्हणजे मग आपल्याला आतले वर्तूळ आणि बाहेरचे वर्तूळ हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरत आहेत असा भास होइल. पण मुळात ते स्थिर आहेत.




४. आता खाली चित्रात समुद्रात बोटींचा एकापाठोपाठ एक ताफा चालला आहे असे वाटते. पण प्रादुर वर कमानी सारखे काही तरी आहे असे वाटते.

५.आता खालील चित्रात पांढरे कपडे घातलेली हि माणसे आहेत कि सफेद रंगचा धबधबा हे सांगाल काय.



६. आता निसर्गाचा हा चमत्कार पहा. पाणी हे  आकारहीन आहे  असे वर्णन करण्यात येते.  मग हे चलचित्र पहा या मध्ये फुग्याला टाचणी लावल्या नंतर सेकंदाचा काही हजारावा भाग पाणी फुग्याचा काही भाग आकार धारण करते हे दिसेल.


आहे कि नाही गंमत.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा