गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

दृष्टी भ्रम अर्थात ILLUSION

एकदा अकबर बादशाहने बिरबलला एक प्रश्न विचारला कि "खरे आणि खोटे यात अंतर किती?"  बिरबलाने लगेच उत्तर दिले कि "चार बोटे". बादशहा चाट पडला म्हणाला कि कसे काय? तेव्हा  बिरबलाने त्वरित समजावले कि कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर असते म्हणजे  जे आपल्या कानाने ऐकू येते त्यावर भले आपण विशास ठेवू न ठेवू  पण जे आपण डोळ्याने पहातो त्या नक्कीच खऱ्या आहेत असे समजावे. बिरबलाने सांगितले ते खरेच होते.

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

शुभशकून



ज्या दिवशी मी या अनुदिनीला सुरवात केली त्या दिवशी घरी गेलो आणि शुभशकून घडून आला. म्हणजे झाले असे कि मला पाहताच माझ्या मुलाने एक घडी केलेला कागद मला दाखविला आणि म्हणाला कि मी एका गणपतीचे चित्र काढले आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने त्याचे काही ना काही उद्योग सुरू  असतात. माझा मुलगा सोहम (वय वर्षे ९ ) ज्याच्या नावाने मी हि अनुदिनी चालू केली आहे हा इंग्रेजी माध्यमात इयत्ता ३ री मध्ये शिकत असुन त्याची पहिल्या पासून चित्रकला खूप चांगली आहे. त्याने एका वहिच्या मुखपृष्टावरील कार्टून गणपतीचे हुबेहूब चित्र त्या कागदावर काढले होते. तेच चित्र मी खाली पोस्ट  केले आहे. हा मला एक प्रकारे चांगला शकून वाटला.  
 बरे असो!   या अनुदिनीवरील लेख हे संकीर्ण असणार आहेत.

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

श्रीगणेशा

मित्रहो ,
हि तर आत्ताशी सुरवात आहे अजून बराच मोठी मजल मला गाठायची आहे. आत्तापर्यंत जे मनात साचून राहिले आहे, जे क्षण आयुष्यात आले त्यांना एकत्र गुंफायचे आहे.
धन्यवाद !