शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

शुभशकून



ज्या दिवशी मी या अनुदिनीला सुरवात केली त्या दिवशी घरी गेलो आणि शुभशकून घडून आला. म्हणजे झाले असे कि मला पाहताच माझ्या मुलाने एक घडी केलेला कागद मला दाखविला आणि म्हणाला कि मी एका गणपतीचे चित्र काढले आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने त्याचे काही ना काही उद्योग सुरू  असतात. माझा मुलगा सोहम (वय वर्षे ९ ) ज्याच्या नावाने मी हि अनुदिनी चालू केली आहे हा इंग्रेजी माध्यमात इयत्ता ३ री मध्ये शिकत असुन त्याची पहिल्या पासून चित्रकला खूप चांगली आहे. त्याने एका वहिच्या मुखपृष्टावरील कार्टून गणपतीचे हुबेहूब चित्र त्या कागदावर काढले होते. तेच चित्र मी खाली पोस्ट  केले आहे. हा मला एक प्रकारे चांगला शकून वाटला.  
 बरे असो!   या अनुदिनीवरील लेख हे संकीर्ण असणार आहेत.



माहिती, विज्ञान , तंत्रज्ञान, मनोरंजन, कला, साहित्य, खवय्येगिरी,  इ . विषयांना  अंतर्भूत करणारे असणार आहेत. तसेच हि माहिती विश्वासनिय  असण्याची पुरेपूर काळजी घेण्यास मी बांधील आहे.
            जर या माहिती संबंधी काही चुका असल्यास,  आपण वाचकांनी त्या माझ्या निदर्शनास आणून सुधारण्यास सहाय्य करावे हि आपल्या चरणी विनंती जेणे करून हि अनुदिनी उत्तरोतर अधिक वाचनीय, लोकप्रिय, आणि लोकोपयोगी  होईल.

धन्यवाद !
।। गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया ।। 

चित्र अधिक मोठे करण्या साठी चित्रावर टिचकी मारा.
 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा