सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

अरे ... हा तर महापूर

गेले दोन दिवस लोकल ट्रेन चे जे काही प्रताप चालले आहेत त्याने सामान्य प्रवाशांचे  खूपच हाल  झाले.  मीही कळवा येथे ट्रेन येत नव्हती म्हणून ठाण्याला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. गाडी जशी स्टेशनच्या परिसरात आली  ती  तिथेच अडकून पडली. खिडकीतून पहिले तर बसच्या मागेपुढे सर्व बाजूला फक्त टूर टूर  करणाऱ्या  ऑटो रिक्षाच दिसत होत्या. आता स्टेशन पर्यंत चालत जाण्याशिव्याय पर्याय नव्हता. खरच काय गमंत आहे पहा भारतात पेट्रोल, डिझेल यांचे भाव नियमित वाढत असताना रोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने कशी काय रस्त्यावर दाखल  होतात?.  हेच जर मी ऑटो रिक्षात बसलो असतो तर दुचाकी वाले इकडून,  तिकडून आपल्या गाडीला वाट देत,  प्रसंगी पादचारी मार्गावर गाडी चढवून पुढे जायला मागतात. जणू पळा,पळा कोण पुढे पळतो  हि स्पर्धा लागली कि काय? असे वाटते.  हा गाड्यांचा महापूर नव्हे काय?
           मग वाटायला लागले कि आपल्या इकडे महापुराची काहीच कमी नाही.

 पावसाळ्यात पाण्याचा महापूर, (खर तर आपण पाण्याच्या ठिकाणी राहायला गेलो आहोत, पाणी आहे तिथेच आहे),  रस्त्यावर गाड्यांचा महापूर, गल्लोगल्लीत देवळांचा महापूर, अभ्यासात परीक्षांचा महापूर (१ल्या इयत्तेपासूनच सुरवात), विविध वाहिन्यांवर मालिकांचा महापूर, आपली अर्थव्यवस्था पोखरणारा भ्रष्ट्राचाराचा महापूर, वाहने बेदरकारपणे चालवण्याने येणारा अपघातांचा महापूर, बेकारीचा महापूर, महिलांवरील अत्याचारांचा महापूर, एक न दोन यादी तरी किती करावी. पण  या सर्वाना कारणीभूत असा लोकसंखेच्या महापूर....  खर तर हा महापूर नसून भस्मासूर आहे ज्याच्यामुळे इतर सर्व गोष्टीं घडून येतात.
      परवा कोल्हापूरच्या महलक्ष्मीला, ज्योतिबा ला  गेलो होतो तिथे सुद्धा देवाला शांतपणे  नमस्कार करायला मिळाला नाही एवढा माणसांचा महापूर. त्यातून मंदिरातले पुजारी,  बडवे आणि ते कमी म्हणून कि काय खाजगीतले सुरक्षा रक्षक हे सर्व लोकांना अक्षरश: रेटा  देत होते, पुढे पुढे ढकल होते.  देवाकडे काही मागणे तर सोडाच , पण मुर्तीकडे शान्तपणे पाहणेही नीटसे झाले नाही.  आता लेकुरे उदंड झाली आहेत असे म्हण्याची पाळी आली आहे.  
त्यामुळे लोकसंख्या वाढीला आळा घातला तरच या महापुरातून आपली सुटका होईल, नाहीतर आपण कधी कोणत्या महापुरात वाहून जावू हे आपणास कळणारही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा