शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

आपण सारे अर्जुन


मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेन ने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच  बनला आहे. याच लोकल ने मी हि प्रवास करतो, माझी पाठीवरची बॅग ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो तर तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती धर्म , पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात. या मध्ये कोणी काळा तर कोणी गोरा, कोणी ऊंच तर कोणी ठेंगू , कोणी तरुण कॉलेज कुमार तर कोणी निवृत्तीला आलेले सदगृहस्त, कोणी नीटनेटका कडक इस्त्री केलेल्या कपड्यात तर कोणी गबाळा, कोणी घाऱ्या डोळ्यांचा तर कोणी नीळा , तपकिरी. प्रत्येकाची चण वेगळी, शरीराची ठेवण वेगळी. पुन्हा हे सगळे जण कसे आपआपल्या उद्योगात मग्न. कोणाचे पेपर वाचन, तर कोणाचे पुस्तक वाचन, कोणी mobile वरती गाणी ऐकण्यात मग्न तर कोणी डोळे मिटून आपल्याच नादात तल्लीन, या प्रवासात जे रोज भेटतात त्यांचा एक समूह (Group ) तयार झालेला असतो. आणि मग त्यांच्यात एक प्रकारचे वेगळे नाते तयार झालेले असते. या भावनिक बंधातून एकत्र येवून स्वखर्चाने दसरा आणि आषाढी एकादशी सारखे सण साजरा करतात. या दोन दिवशी संपूर्ण गाडीमध्ये पताका,फुले यांनी गाडी सजवून देवांचे फोटो लावून पूजा केली जाते प्रसाद वाटला जातो.  इतर दिवशीही  रोजाचा ढोकळा, इडली, सामोसा असा काहीना काही नाश्ता ते लोक (वर्गणी काढून) करतात.




               पण हि लोकल पकडायची म्हणजे एक कसरतच असते. हि ठराविक लोकल सहसा कोणी चुकू देत नाही . जणू काही हि ट्रेन पकडली नाही तर अपमान अगदी घोर अपमान असे वाटावे. आणि याच बाबतीत आपण सारे अर्जुन असतो असे मी म्हणतो. तुम्ही स्टेशन वर पोहोचता तेव्हा platphorm खचाखाच गर्दीने ओसंडून वाहत असतो. त्यात ट्रेन अगोदरच पाच, दहा मिनटे जरी उशिरा आली तर गर्दीचा महापूर. आणि जसा ट्रेनचा पहिला डब्बा platphorm मध्ये शिरतो तसे सगळेच सज्ज होतात. आपापले पाकीट,बॅग तर महिला आपल्या पर्स, दागिने सांभाळून आपल्या समोर आलेल्या डब्याच्या handel वर लक्ष केंद्रित करतात. अशा वेळी म्हणजे या क्षणी आपण सगळेच आजूबाजूचे सर्व जग विसरून जातो किंबहुना इतर सर्व गोष्टी अपोपाच धुसर होतात आणि आपल्याला दिसत असते ते फक्त दरवाजाचे handel किवा मधला खांब अगदी तसाच जसा अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता. आणि एकदा ते handal हाती लागले कि मग तुम्ही जणू काही लढाई जिंकल्याचा आनंद होत असतो. मग आपल्या इच्छित स्थळी जायला मोकळे. पण खरच हा प्रवास म्हणजे एक वेगळे विश्व आहे माझ्यासाठी. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा